वर्धापन दिनी 'शिवाई बस' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण


पुण्यातील शंकर शेठ एसटी महामंडळाच्या  विभागीय कार्यालयात एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक बसचा ( शिवाई) लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परीवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते शिवाई ई बसचे आणि पहिल्या चार्जिंग स्टेशनचे  उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे, आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य परीवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप 8बदल केले असून, महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच, गुणवत्ता वाढीसाठी आणि नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे हे एसटीचे ध्येय आहे. याच उद्दिष्टावर आधारीत प्रदूषण विरहीत, आवाज विरहीत 'शिवाई' बस आहे. 

शिवाई बसमध्ये वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल, असे सांगून राज्य परीवहन महामंडळाच्या ७४ वर्षांच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना उपमुख्यमंत्री यांनी धन्यवाद दिले. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments