सोलापूर - पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे विशेष पथकाने TATA IPL २०२२ गुजरात टायटन विरुध्द लखनऊ सुपर जाईट या क्रिकेट सामन्याचा ऑनलाईन सट्टा घेत असताना तेथे छापा टाकुन ३ इसमांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून किंमत १ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१०/०५/२०२२ रोजी TATA IPL २०२२ गुजरात टायटन विरुध्द लखनऊ सुपर जाईंट या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा ३४/०२ मोतीलाल नगर झोपडपट्टी,साईबाबा चौक न्यु पाच्छा पेठ, सोलापूर येथे येथे घेत असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी दोन पंचासह शिताफीने छापा टाकला असता सदर घरामध्ये १) सुनिल अशोक दाते हा त्याचे साथीदार नामे २) विनायक ईरप्पा पुरुड वय-३२ वर्षे, ३) चंदन विनुगोपाल बडगंची वय ३४ वर्षे यांच्यासह १ टि.व्हि., ०१ लॅपटॉप, ०७ विविध कंपन्यांचे मोबाईल १ सेटअपबॉक्स ०१ कॅल्क्युलेटर, असे सर्व साहित्य असे एकुण किंमत १ लाख रुपये किंमतीच्या साहित्यसह ऑनलाईन सट्टा घेत असताना मिळुन आले.
त्यांनी क्रिकेट मॅच पाहत, किती धावा होतील व शेवटी सामना कोणती टिम जिंकेल, यावर मोबाईलद्वारे सट्टा लावणारे इसमांकडुन फोनवरून सटटा घेत असताना, त्याचा हिशोब लॅपटॉप मध्ये घेऊन TATA IPL २०२२ गुजरात टायटन विरुध्द लखनऊ सुपर जाईंट या सामन्यांवर सट्टा घेण्यासाठी वापरात असलेले वरील वर्णनाचे मिळुन आलेले साहित्य हे सटटेबाजांकडुन जमा होणारी रक्कम व त्यांना मिळालेली रक्कम यामध्ये लाखो रुपयांचा लाभ सट्टा चालविणारे मालक भागीदार, साथीदार यांना होत असुन या मधील भागीदार हे बक्षिसाच्या रकमेचे अमिष दाखवून सर्व सामान्य लोकांची फसवणुक करीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रितसर पंचनामा करुन त्यांचे विरुध्द जेलरोड पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम ४२०, १०९ सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ ५ सह व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ चे कलम ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त हरीष बैजल यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे,पोलीस हवालदार दिलीप भालशंकर,पोलीस नाईक योगेश बर्डे,पोलीस नाईक वाजीद पटेल,पोलीस कॉन्स्टेबल संजय साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नक्का,पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख (सायबर सेल) यांनी केली आहे.
0 Comments