गौडगाव ता. बार्शी येथे नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. आझादिका अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे चला मुलांनो उजेडाकडे या योजने द्वारे o ते १८ वयोगटातील ९२ मुलांची नेत्रचिकित्सा शिबीरात तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ मुलांना चष्मा नंबर देण्यात आले.
मुलांचा मोबाईलचा अतिवापर, बदलती जीवनशैली, आहारामधील जीवनसत्त्वाची कमी यामुळे हे दृष्टीदोष व चष्मे चे प्रमाण वाढत आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्यांना यापासून जागृत करावे.
सदरील शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा थिटे, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. खंडेलवाल मॅडम, डॉ. केसकर यांचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी बालाजी पैकेकर, राहुल भड, नागेश काजळे, मोहन भडसर, अमोल सोनवणे, बंडगर सिस्टर, आशा गटप्रवर्तक वैशाली पाटील, मडके मॅडम आदी उपस्थित होते.
0 Comments