बार्शी! इर्ले सोसायटी सोपल गटाच्या ताब्यात


वैराग/प्रतिनिधी:

इर्ले विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिलीप सोपल गटाने बारा जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली असून विरोधी आ .राऊत गटाचा एकाच जागेवर उमेदवार विजयी झाला. 
     
 इर्ले विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक माजी मंत्री दिलीप सोपल प्रणित विठ्ठल बिरुदेव स्वाभिमानी आघाडी  विरुध्द  आमदार राजेंद्र राऊत प्रणित  विठ्ठल बिरुदेव शेतकरी विकास आघाडी या दोन्ही आघाड्यात अत्यंत चुरसीने मतदान झाले .यात सोपल प्रणित विठ्ठल बिरुदेव स्वाभिमानी आघाडीचे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून  सुधामती रामा चव्हाण , इतर मागास प्रवर्गातून रमेश हरिश्चंद्र कुंभार तर भटक्या -विमुक्त जाती प्रवर्गातून विलास भाऊराव देवकते हे बिनविरोध निवडून आले होते . .त्यानंतर झालेल्या मतदानात सर्वसाधारण प्रवर्गातून किरण दिनकर पाटील (  २१३) ,प्रकाश सुखदेव देवकते (२०३ ) ,अरुण दादाराव जगदाळे(१९३ ) ,बबन दगडू काजळे ( १८५ )  , रंगनाथ बजरंग गायकवाड ( १७९ ),लहू अंबादास गायकवाड(१७८ ) ,अशोक लिंबाजी वायकुळे (१७५ ) महिला प्रवर्गातून नीता युवराज डुरे (१९४ ) ,अप्रुपाबाई विक्रम वायकुळे (१८५ ) हे  सोपल गटाचे नऊ उमेदवार विजयी झाले . सोपल गटाचे असे एकूण उमेदवार बारा उमेदवार विजयी झाले असून इर्ले सोसायटीवर निर्विवाद सत्ता आली आहे . तर आमदार राजेंद्र राऊत गट प्रणित विठ्ठल बिरुदेव शेतकरी विकास आघाडीचे रोहित रत्नाकर  डुरे ( १८२ ) हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत .
     
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. महाडिक यांनी काम पाहिले . निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून विजय साजरा केला .

Post a Comment

0 Comments