दुःखद! कडबा कुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू



अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगाव  येथे हृदय हेलावून टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांसाठी कडबाकुट्टी करत असताना महिलेच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यत्राच्या बेल्टमध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सरिता अजिनाथ गवते (वय- २५) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पती आजिनाथ व सरिता हे दोघे सकाळी ७ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना नजर चुकीने सरिताच्या साडीचा पदर कडबा कुट्टी यंत्राच्या बेल्टमध्ये अडकला गेला होता. सरिता हिचे डोके मशीनवर मागील बाजूने जोरदार आदळले. डोक्याला मोठी जखम झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. या घटनेनंतर तात्काळ महिलेला नगर येथील रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाजवळ जात असतांनाच रस्त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने देवगाव परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केला जात आहे. महिलेला ३ वर्षाचा मुलगा तसेच ११ महिन्याची लहान मुलगी आहे.

Post a Comment

0 Comments