केंद्रानेच राजद्रोहाचं कलम रद्द करावे : गृहमंत्री


राणा दाम्पत्यावर ठाकरे सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला त्यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले आहे त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. , “राजद्रोहाच्या कलमाबाबत आता केंद्रानेच गाईडलाईन ठरवणे गरजेचे आहे. जर केंद्राने राजद्रोहाचं कलमच रद्द करण्याचे ठरवले तर ते करू शकतात.  

जर राजद्रोहाचा कायदाच राहणार नाही, तर त्याचा गैरवापरही होणार नाही.” राज्यासमोर महागाईचा प्रशन आहे, औद्योगिक आणि कृषी क्षेत्र अडचणीत आहे. अशात सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आंदोलन न होता भोंगे आणि इतर समाजात दुही निर्माण करणाऱ्या विषयांवर आंदोलन होतांना दिसत आहेत. भाजपचे काही नेते जाणूनबूजून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करत आहेत असा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला.

Post a Comment

0 Comments