दिव्यांग मुलाचे आरोग्य चांगले करणे आणि पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता एका मांत्रिकाने विधी करत पीडित महिलेचा विनयभंग करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत. धनंजय गोहाड उर्फ नाना (रा.मांजरी बुद्रुक) असे मांत्रिकाचे नाव असून त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे, तर शिष्या सुरेखा जमदाडे (रा.गंगा नगर, फुरसुंगी) ही फरार आहे.
ही घटना जानेवारी २०२१ ते २६ मे २०२२ दरम्यान घडली. याप्रकरणी मंत्रिकासह त्याला मदत करणाऱ्या महिला शिष्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न, अपहार, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments