पानगाव येथील संत तुकाराम विद्यालयात आज माजी सैनिक, शहिद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा पार पडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या व प्रसंगी प्राणाची बाजी लावणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांचा व कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी मेजर अमित कापसे, मेजर जगन्नाथ कापसे, वीरपिता भगवान आबा मोरे, वीरपूत्र रविंद्र दिगंबर चव्हाण, मेजर दामोदर पवार, मेजर गोपीनाथ कानगुडे, मेजर राजेश चव्हाण, मेजर निलेश काळे, मेजर सचिन कापसे, मेजर बापूसाहेब कानगुडे, सुशीला भुतेकर, इंद्रजीत भुतेकर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आप्पासाहेब कानगुडे, दत्तूनाना काळे, अजित पाटील, पिंटू नाईकवाडी, संतोष कानगुडे, श्रीमती विजयाताई मोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व सत्कारमूर्तीच्या वतीने मेजर दामोदर पवार व मेजर अमित कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा व समाजासाठी माजी सैनिक संघटना सदैव कार्यतत्पर राहील अशी ग्वाही देऊन शालेय विद्यार्थ्यांकडून देशसेवा करण्याची व सैन्यभरती साठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दत्तूनाना काळे, संतोष कानगुडे श्रीमती विजयाताई मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळा राबवत असलेल्या अनेक उपक्रमाबाबत कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शपी.पी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दोडय्या स्वामी यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थांना अल्पोपाहाराचे वाटत करण्यात आले.
0 Comments