बार्शी- तालुक्यात हरीत क्रांती घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनास सादर झालेल्या अंदाजपत्रकानुसार बार्शी तालुक्यातील रुई व सौंदरे येथील पाझर तलावाची साठवण क्षमता वाढवून त्याचे साठवण तलावात रूपांतर करणेकामी जवळपास १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याकरिता महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील रुई येथील जुन्या पाझर तलावाची साठवण क्षमता २५९ संघही एवढी आहे व सिंचन क्षेत्र ६० हेक्टर इतके आहे. सदरच्या रूई गावाजवळील स्थानिक नाल्यावर असलेल्या तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी प्रशासकीय मान्यता सहीत ४ कोटी, ९७ लाख, ४२ हजार,२७३ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या साठवण तलावाचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल.
त्याचप्रमाणे तालुक्यातील सौंदरे येथील जुन्या पाझर तलावाची साठवण क्षमता २७५ सघमी एवढी आहे व सिंचन क्षेत्र ६० हेक्टर इतके आहे. सदरच्या जुन्या पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी प्रशासकीय मान्यता सहीत ४ कोटी, ९७ लाख, २१ हजार, ३२१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होईल. सदरच्या योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत निधी उपलब्ध झाला असून जुन्या पाझर तलावा इतकीच साठवण क्षमता प्रस्तावित केली आहे.
सदर योजनेसाठी लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक आहे. सदरची योजना देखभाल दुरुस्तीसाठी नियमानुसार हस्तांतरित करावी लागणार आहे.
0 Comments