बार्शी/प्रतिनिधी:
शेताच्या सामाईक बांधावरुन रस्ता करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून मारहाण करण्याची घटना उंबरगे येथे घडली. रामेश्वर बाळासाहेब गुळवे (वय २९) रा. उंबरगे, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांविरूध्द तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, उम्बर्गे शिवारामध्ये फिर्यादीच्या शेतीगटा शेजारील पांडुरंग गोवर्धन भांगे यांचा शेतीगट आहे. सदर दोन्ही शेतीगटाचे सामाईक बांधावरुन रस्ता करण्यासाठीच्या वादामुळे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
दि. ६ मे रोजी रामेश्वर गुळवे, भाऊ दत्तात्रय गुळवे (वय २८) व वडिल बाळासाहेब गुळवे (वय ६६) हे शेतात काम करत असताना, पांडुरंग गोवर्धन भांगे, मन्मथ जगन्नाथ गुळवे, शिवानंद उर्फ बबन शंकर गुळवे, विशाल उर्फ महेश शंकर गुळवे, विक्रम मदन गुळवे, विठ्ठल चांगदेव जाधव, चंद्रहास्य मदन गुळवे व चंद्रसेन उर्फ चंदू धन्यकुमार गुळवे (सर्व रा. उंबरगे, ता. बार्शी) हे तेथे आले. आणि तुम्ही रस्ता कसा देत नाही ते बघू असे म्हणून शिवीगाळी करु लागले. त्यांना शिवीगाळी करु नका म्हणताच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन, शिवानंद उर्फ बबन शंकर गुळवे याने पाठीमागून दगड फेकून माझ्या डोक्यात मारला. वडिलांस व भावांस मारहाण केली. त्यावेळी रुपचंद गुळवे यांनी भांडण सोडविल्यामुळे सदर लोकांनी आम्हाला मारहाण करणे थांबवले. रामेश्वर गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments