आर्थर रोड कारागृहात तरुणाने अनैसर्गिक संभोग केल्याचा प्रकार उघडकीस




आर्थर रोड कारागृहामध्ये  एका अंडर ट्रायल आरोपीने त्याच बॅरेकमध्ये असलेल्या दुसऱ्या अंडर ट्रायल आरोपीवर रविवार रात्री अनैसर्गिक संभोग केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती आज सकाळी जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर प्रशासनाने आरोपी तरुणाविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीविरोधात कलम 377, 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणाची पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करण्यात आची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थर रोड जेल प्रशासनामध्ये अंडर ट्रायल 19 वर्षीय आरोपीने सोबत असलेल्या तरुणावर अनैसर्गिक संभोग केल्याची तक्रार अर्थ रोड जेल प्रशासनाकडून देण्यात आली. या तक्रारीत म्हटले आहे की रविवार रात्री आरोपी तरुणाने पीडित तरुणावर अत्याचार केला त्यावेळी त्याने आरोपी तरुणाचे तोंड दाबून त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकरणाची माहिती सकाळी पिडीत तरुणाने जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिली. नंतर आरोपीला ठाणे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले या संबंधी प्रकरणाचे तपास एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशन करत आहे.

Post a Comment

0 Comments