वैराग/ शुभम गोवर्धन;
दिनांक १७ मे मंगळवार मध्यरात्रीच्या अडीच वाजण्याच्या सुमारास केसरी चौक कासार गल्ली वैराग येथील. नामवंत वैराग मध्ये प्रसिद्ध असलेले टेलर सतीश टेलर यांच्या 3 फ्लोअर बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर आज मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा अंदाज वर्तवला जात आहे.
ही आग गांधी चौक वैराग येथील बाळासाहेब भूमकर यांना मध्यरात्रीच्या सुमारास निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी बाळासाहेब कासार यांना कळीवले त्यानंतर कासार यांनी सतीश टेलर यांना कॉल करून बोलावून घेतले व आज विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आगीचा वेग इतका प्रचंड होता की तिसऱ्या मजल्यावर जाऊन आग विजवण्यसाठी सर्वांनी शर्तिचे प्रयत्न देखील करण्यास सुरुवात केले. यामध्ये काही व्यक्ती देखील किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यांनतर आग आटोक्यात आल्यानंतर बार्शी येथील अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत परिसरातील नागरिकांनी आग विजवन्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आग विजवण्यात आली.
या आगीमध्ये सतीश टेलर याच्या तिसऱ्या मजल्यावरील सुझुकी कंपनीच्या १० शिलाई मशीन, सीलिंग फॅन,टेबल,कामगारांसाठी कटिंग करून ठेवलेले कपडे,असा अंदाजे ९ ते १० लाखापर्यंत नुकसान झाले आहे असे सांगण्यात येत आहे. वैराग एवढे मोठे गाव असून आता नगरपंचायत देखील झालेली असताना वैराग सारख्या गावामध्ये एखादी तरी अग्निशामक दलाची वाहन असायला हवी अशी मागणी आता सर्वसामान्य व्यापारी वर्गातून आणि नागरिकांमधून होत आहे.
0 Comments