पालकमंत्री बदलणे भाजीपाला आहे का? दत्तात्रय भरणे चिडले



सोलापूर/प्रतिनिधी:

उजनी पाण्याचा प्रश्न सोलापुरात ज्वलंत झाला आहे. लाकडी निंबोळी योजने अंतर्गत उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती येथे वळवण्यात आले आहे.यावरून सोलापुरात पालकमंत्री बदलाबाबत मागणी होत आहे. उजनी धारणातील पाणी वळवू देणार कुठेही जाऊ देणार नाही अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. पालकमंत्री बदलले जाणार का असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता दत्ता भरणे संतापले.आणि पालकमंत्री बदलणे एवढं सोपं नव्हे, काय भाजीपाला आहे का असे उत्तर पालकमंत्र्यांनी माध्यमांना दिलं. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो, पद बदलणे एवढे सोपे नाही असेही त्यांनी विरोध करणाऱ्यांना टोला दिला.

प्रणिती शिंदेना पालकमंत्री दत्ता भरणेंच सौम्य उत्तर- 

सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी उजनी पाणी प्रश्नावरून आपला संताप व्यक्त केला होता.सोलापूरच्या हक्काचं पाणी कोणी पळवत असेल तर आम्ही रान पेटवू असे सांगितले होते. त्याबाबत पालकमंत्री दत्ता भरणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, आमदार प्रणिती शिंदे या खूप अभ्यासू आहेत. आमदार प्रणिती शिंदेच काहीतरी गैरसमज झाला असेल. आमदार प्रणिती शिंदेनी इरिगेशन खात्याकडून माहिती घ्यावी, त्यांनचा गैरसमज दूर होईल. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.


पालकमंत्र्यांचा सोलापूर दौरा-

पालकमंत्री दत्ता भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. पार्क चौक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्मार्ट सिटीचे सीईओ ढेंगळे पाटील आदी अधिकाऱ्यांनासोबत जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली आणि योग्य त्या सूचना दिल्या.




Post a Comment

0 Comments