बार्शी! खांडवीमध्ये जागेच्या वादावरुन वडील व भावास मारहाण



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील खांडवी गावांमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहेत. भावास वडीलास मारहाण केल्याची घटना घडली आहे, शंभूदेव श्रीपती दळवी (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघाजना विरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी शंभूदेव मुंबई मधील नामांकित हॉस्पिटल मध्ये समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील व भाऊ व इतर कुटुंबीय गावाकडेच असतात. वडील श्रीपती सोमा दळवी (वय ८९) व फिर्यादी व त्यांचा धाकटा बंधू महादेव श्रीपती दळवी यांच्या घर जागेबाबत २०२२ पासून वाद सुरू आहे. आठ मे रोजी फिर्यादी व त्यांचे वडील खांडवी तील घरासमोर थांबले असताना त्यांचा भाऊ श्रीपती दळवी मुलगा प्रथमेश पत्नी सुरेखा त्यांच्याजवळ आले तू घरा समोरील मोकळ्या जागेत घर बांधायचे नाही बांधायला गेला तर बघून घेऊ असे म्हणत शिवीगाळ करू लागले. ओ फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण नाही करू लागले लागलेली भांडण सोडवण्यासाठी वडील मध्ये आले असता वडीलाल आहे मारहाण केली आहे. तू आमचा नाद करायचा नाहीस नाद केला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी व त्यांच्या वडिलांना उपचारासाठी बार्शी शहरातील जगदाळे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिविल हॉस्पिटल सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये महादेव श्रीपती दळवी, प्रथमेश माधव दळवी व सुरेखा माधव दळवी या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments