सांगोला! पत्नीला नांदायला न पाठवणाऱ्या सासरे, मेहुण्यावर चाकू हल्ला ; जावयावर गुन्हा दाखल


सांगोला/ प्रतिनिधी:

पत्नीला नांदायला पाठवणार नाही, आई वडिलांना घेऊन ये म्हणाल्याने चिडून जाऊन जावायाने सासरे आणि मेव्हण्यावर चक्क चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सांगोला तालुक्यात चोपड़ी येथे घडला. हा प्रकार घडला असून याप्रकरणी सांगोला पोलिसांनी जावई निघून गेला. नितीन बाबासाहेब कस्तुरे (रा. बिरणवाडी, ता. तासगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात सासरे किसन वाघमारे आणि मेव्हणे समाधान वाघमारे (रा. चोपडी, ता. सांगोला) हे जखमी झाले. 

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, जावई नितीन कस्तुरे याने पत्नी सोनाली व दोन मुलांना चोपडी येथे सासुरवाडीला आणून सोडले होते. त्यावेळी तो घरात न येताच रस्त्यावर थांबून गावी निघून गेला. त्यानंतर दोन दिवसांनी सकाळी ९ च्या सुमारास तो सासऱ्यांच्या घरी आला. पत्नीस मारहाण करून मुलगा संस्कार व मुलगी कार्तिकी यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा रात्री १० च्या सुमारास सासुरवाडीत येऊन पत्नीला सोबत पाठवा, असे सासरे किसन वाघमारे यांना म्हणाला. यावर ते मुलीला चांगले सांभाळत नाही म्हणत सोबत पाठवण्यास नकार दिला. यावेळी तो चिडून त्यांना शिवीगाळ करून तेथून पुन्हा रात्री ११. ३०च्या सुमारास तो कारमधून येऊन मुलगा संस्कार व मुलगी कार्तिकी दोन मुलांना सासरी आणून सोडले. 

त्याहीवेळी तो पत्नी सोनालीला सोबत पाठवून द्या म्हणाला असता त्यांनी त्याच्या आई-वडिलांना घेऊन येण्याबाबत सुनावले. चिडलेल्या नितीनने चाकूने सासरे किसन यांच्या उजव्या हाताचा अंगठा, हनुवटीवर वार केले. त्याच चाकूने त्याने मेव्हणे समाधान याच्या पाठीवर मारून जखमी केले. भांडणे पाहून शेजारी राहणारे विनायक तोरणे व शामराव वाघमारे धावून येत त्यांना सोडवले.

Post a Comment

0 Comments