उस्मानाबाद जिल्ह्यातील. एक 35 वर्षी विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका तरुणाने घरात प्रवेश करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच त्या महिलेस मारहान करुन घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगीतल्यास तीच्यासह तीच्या पतीस ठार मारण्याची धमकी तीला दिली.
यावनंतर त्या तरुणाने तीच्या स्मार्टफोन मध्ये फोनपे ॲप घेउन त्या मार्फत स्वत: च्या बँक खात्यावर 36, 000 ₹ परस्पर वळवून त्या महिलेची फसवणूक केली. याचा जाब त्या महिलेने विचारला असता त्याने तीच्या घरातील कपाटाचा आरसा व टीव्ही रिमोट फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 376, 323, 506, 420, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments