सोलापूर/प्रतिनिधी:
माझं लवकर लग्न का लावून देत नाही, असे म्हणत आजीच्या डोक्यात लाकडाने मारहाण करून खून केल्यापची घटना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.आजीचा नातवाने खून केल्याने सोलापुरात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. नातवाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर, मित्र नगर शेळगी येथील राहत्या घरी घडला. सलीम जहाँगीर नदाफ (रा. जिंरकली राज्य कर्नाटक, सध्या आदर्श नगर, शेळगी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सलीम नदाफ हा कर्नाटकात जिरंकली येथे बिगारीचे काम करतो. त्याचे लग्न करण्यासाठी मुली पाहण्याचे काम सुरू होते. आजी मालनबी हसनसाहब नदाफ (वय ७०, रा. आदर्श नगर, शेळगी) यांनी सलीम नदाफ याला सोलापुरात मुलगी पाहण्यासाठी बोलावून घेतले होते.आणि त्याने आजीचा खून केला आहे.सध्या संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
त्याला काही मुली दाखवल्या पण लग्न काही जमले नाही-
सलीम नदाफ काही दिवसांपूर्वी सोलापुरात आला व काही ठिकाणी त्याने मुली पाहिल्या. मात्र, लग्न जुळत नसल्याने तो तणावात आला होता.१४ मे रोजी आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या होत्या, तेव्हा सलीम नदाफ आला व त्याने आजीला तू माझे लग्न का लावून देत नाही.? उगाच मला कर्नाटकातून येथे का बोलावून घेतली, असा जाब विचारला.
अन त्यांने आजीच्या डोक्यात लाकडाने प्रहार केला-
लग्न का लावून देत नाही यावरून सलीम व आजी मालन यांमध्ये वादविवाद झाला.सलीम नदाफ याने चिडून आजीच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केला. यामध्ये मालनबी नदाफ यांच्या डोक्यात जबर जखमा झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फिरोज शकुर नदाफ (वय २५,रा. आदर्श नगर, मित्र नगर शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.यावरून सलीम नदाफ या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.याचा अधिक तपास पीएसआय संजीवनी करत आहेत.
संशयीत आरोपी नातवास पाच दिवसांची पोलीस कोठडी- आजीचा खून केल्याप्रकरणी सलीम नदाफ याला जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्याला रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीशांनी त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लग्नाच्या घाई गडबडीत तो गेला पोलीस कोठडीत-
मालनबी नदाफ या सोलापुरात सख्या बहिणीच्या घरी राहत होत्या. नातवाचे लग्न जमत नसल्याने त्यांनी सलीम नदाफ याला गुलबर्गा येथून बोलावून घेतले होते. मात्र, सलीम नदाफला लग्नाची घाई झाली होती. कधी मुलगी जमेल अन् लग्न होईल, असे त्याला वाटत होते. त्यातून त्याने रागाच्या भरात आजीचा खून केला .लग्नाच्या घाईगडबडीत त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागली.
0 Comments