बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील महत्त्वाच्या धामणगाव दुमाला येथील विकास सेवा सोसायटीवर युवक नेते पांडुरंग ऊर्फ नानासाहेब पाटील यांची चेअरमन म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून एस एस महाडिक यांनी काम पाहिले. आजवर अतिशय निस्वार्थी वृत्तीने केलेल्या कामाची धामणगावकर ग्रामस्थांनी त्यांना पोचपावती दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
अतिशय धाडसी, प्रामाणिक, निष्ठावंत अभ्यासू विकासाभिमुख चेहरा म्हणून त्यांची बार्शी तालुक्यातील ग्रामीण राजकारणात ओळख आहे. भाजपा नेते राजेंद्र मिरगणेयांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपल्या धाडस व अभ्यासाच्या जीवावर गावातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावलेले आहेत. शब्दाला जागणार, प्रशासनावर वचक असणार, धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख तालुक्यातील राजकारणात आहे. त्यांनी दिलेली आश्वासन आत्तापर्यंत पूर्ण करीत आलेले आहेत हे ग्रामीण राजकारणातील एक दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल.
त्यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव विकास सेवा सोसायटी की शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते तिची भरभराट होईल असे सर्व स्थरातून बोलले जात आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी नूतन चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचा फेटा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली.
या निवडी प्रसंगी सोसायटीचे सेक्रेटरी सुनील (भाऊसाहेब) काशीद, सरपंच शिवाजीराव पाटील, माजी सरपंच किसनराव जाधव ,किसनराव भोसले, माजी चेअरमन माधव मसाळ, उपसरपंच नानासाहेब कदम , बाबासाहेब शिंदे ,सज्जनराव ढेकणे, ह .भ. प .कुंडलिक महाराज पाटील धामणगावकर, गजानन बोधले, उत्तम आप्पा बोधले ,जगन्नाथ जाधव, दिलीपराव जाधव, संतोष ताटे, दत्ता देशमुख नूतन सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायत सर्व आजी-माजी सदस्य , कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
नूतन चेअरमन
1) पांडुरंग (नाना) पाटील (चेअरमन)
2) माणिक तुकाराम ढेकणे ( व्हाईस चेअरमन)
नूतन संचालक
1)श्रीहरी मारुती जगताप
2)विनायक नरसिंग देशमुख
3)अलका महादेव देशमुख
4) वंदना राजभाऊ कोरके
5) शहनाज रमजान शेख
6) ज्ञानदेव निवृत्ती कोरके
7) नंदू भाऊ मसाळ
8) बबन व्यंकट जगताप
9)अनंत मोहन हेडंबे
10)जावेद इनुस शेख
11)रावसाहेब निवृत्ती जाधव
1 Comments
अभिनंदन नाना
ReplyDelete