'ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ३ मे रोजी जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्याला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नसत्या भानगडी सोडा असं म्हणत त्यांनी दानवेंनाच टोला हाणला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी १४५ चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचा मुख्यमंत्री बसेल, असं अजित पवार म्हणाले.
0 Comments