मोहोळ तालुक्यात दोन चिमुकल्याना विष पाजून आईने केली आत्महत्या



मोहोळ तालुक्यातील पेनूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या सात वर्षाच्या मुलीसह चार वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजून स्वतः टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवलीय. प्रियांका चवरे असे महिलेचे नाव असून सात महिन्याच्या सुप्रियचा यामध्ये  मृत्यू झाला आहे. तर चार वर्षाच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये घरगुती वाद सुरू होते. याच वादामुळे प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 

ही घटना दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सध्या या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments