मंगळवेढा! विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ


मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदी पात्रात असलेल्या वाळू पॉइंटवर चहा टपरीधारक ४० वर्षीय महिलेला तु मला खूप आवडतसे असे म्हणत तिचा हात पकडून खाली पाडून विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विठ्ठल मळगे, बबलू राजपूत, वैभव पाटील (रा. तांडोर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील ४० वर्षीय फिर्यादी महिलेची तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रात वाळू च्या पॉईंटवर चहाची टपरी असून या टपरीजवळ वरील आरोपीनी येऊन तुझ्याकडे माल आहे का?

असे विचारले असता पिडीत फिर्यादीने कसला माल मी फक्त चहा बिस्किटे विकत आहे. तुला माहीत नाही का कसला माल, तुम्हाला मस्ती आलीय असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत तुमच्याकडे बघतो असे म्हणत वरील आरोपींनी पीडित महिलेचा हात धरून तू मला खूप आवडतेस म्हणत पाला मध्ये खाली पाडून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments