बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री दारू पिऊन गोंधळ घातल्याबद्दल वैराग पोलिसात एका ४३ वर्षीय इसमावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, वैराग पोलीस पेट्रोलिंग करत असताना २२ मे च्या मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान एक इसम घाणेगाव चौकामध्ये रस्त्यावर आरडाओरडा करताना आढळून आला. पोलिसांनी जवळ जाऊन चौकशी केली असता त्याच्या तोंडाचा आंबट उग्र वास आला, त्याला नाव विचारले असता विजय संभाजी मोरे वय ४३ रा. घाणेगाव ता. बार्शी असे सांगितले सदर इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करता प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग येथे पाठवले. त्यावेळी तो दारूच्या आधिपत्याखाली आढळला त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ८५ (१) प्रमाणे वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments