बार्शी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुका कृषी विभागाचे अधिकारी व खत विक्रेते यांच्या सोबत, सन २०२२-२३ ची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली.
या बैठकीत तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र, त्याचप्रमाणे खरीप हंगामाच्या लागवडीलायक एकूण क्षेत्र, खरीप सरासरी क्षेत्र, भाजीपाला, फळबागा लागवडीचे क्षेत्र, एकूण खातेदार व खरीप गावांची संख्या, सन २०२१-२२ यामध्ये झालेला सरासरी पाऊस या सर्व गोष्टींची माहिती घेऊन, सद्यःस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती बी-बियाणे, खते व कीटकनाशके यांची उपलब्धता करावी, शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना आ. राऊत यांनी या बैठकीत दिल्या. तसेच येणाऱ्या खरीप हंगामासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
या आढावा बैठकीस तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक प्रा. प्रकाश मनगिरे, मंडळ कृषी अधिकारी भारत महिंगडे, सोमनाथ साठे, सौ. स्वाती सांगळे, जीवन जगदाळे, अमोल गायकवाड, सुधीर काशीद, एन.बी. जगताप, खत विक्रेते राहुल मुंढे, उमेश चव्हाण, बप्पा कोकाटे, नाना मते आदी उपस्थित होते.
0 Comments