पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान रामदास आठवले यांनी मारली डुलकी



सोलापूर  येथील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना आठवले यांना झोप अनावर झाली आणि भर कार्यक्रमात आठवले यांना डुलकी लागली. कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेन आयोजित करण्यात आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. व्हीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. काही प्रश्नोत्तरांचा तास झाला. याच कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे भाषण सुरू असतानाच भर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झोप अनावर झाली. त्यांना काही काळासाठी डुलकी लागल्याचं चित्र दिसून आलं.

Post a Comment

0 Comments