बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना 4 मे रोजी रात्री तीनच्या दरम्यान टाकणखार रोड बार्शी येथे आलो असता तेथे एक इसम टाकणखार रोड नगराध्यक्ष चे घराचे आडोशाला
अंधारात दबा धरून बसलेला आम्हला दिसला त्याचा आम्हास संशय आल्याने त्यास जागेवरच पकडले. त्यास त्याचे
नाव गाव काय आहे व सदर ठिकाणी नमूद वेळी तो का थांबलेला आहे, याबाबत विचारणा करता तो सदरबाबत सांगण्यास टाळाटाळ करुन उडवा उडवीची उत्तरे देउ लागला.
त्यास अधिक विश्वासात घेवून त्यास त्याचे नाव गाव काय आहे याबाबत विचारणा केली असता, त्याने त्याचे नाव विश्वनाथ दत्तात्रय ढेकळे वय 25 वर्षे, रा. जुना बस डेपोच्या पाठीमागे शिवरत्न चौक उस्मानाबाद जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगीतले. त्यास सदर ठिकाणी सदरवेळी थांबला असण्याचे कारण विचारले असता, तो काही एक समाधानकारक उत्तरे देत नाही, आपले अस्तित्व लपवुन दबा धरून बसलेल्या अवस्थेत मिळून आला असून, तो सदरवेळी टाकणखार रोड नगराध्यक्ष चे घराचे आडोशाला अंधारात थांबला असण्याचे कारणाबाबत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने तो मालाविषयी काही तरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उददेशाने सदर ठिकाणी अंधारात आपले अस्तित्व लपवून बसलेला मिळून आल्याने माझी त्याचेविरुध्द महा. पोलीस कायदा कलम 122 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांनी शहर पोलिसात दिली आहे.
0 Comments