बसपाकडून वैराग नगरपंचायतचा मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन



वैराग/प्रतिनिधी:

बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने वैराग नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले, सदर निवेदनामध्ये विविध योजना  वैराग ग्रामपंचायत असताना व आज नगरपंचायत असतानादेखील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांपासून दूर ठेवल्याचे दिसून येते. प्रस्थापित राजकारण्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतात, परंतु ज्यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही अशा गरजू असणाऱ्या जनतेला अशा योजनांपासून लांब ठेवले गेले म्हणून बहुजन समाज पार्टी या गरीब जनतेला ज्यांना आज तागायत कोणत्याही प्रकारचा लाभ कसलाही लाभ मिळाला नाही.

 आशा गरीब जनतेला देण्याची मागणी बहुजन समाज पार्टी करत आहे, अन्यथा बहुजन समाज पार्टीला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. त्याची जबाबदारी शासन व प्रशासन यांचे असेल, यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कोषाध्यक्ष विलास शेरखाने, वैराग प्रभारी नागेश ठोंबरे, वैराग शहर अध्यक्ष ताजोदीन ( बाबा )  शेख, वैराग शहर कोषाध्यक्ष करण सकट त्याचबरोबर वडार भाई चारा विधानसभा अध्यक्ष बार्शी परमेश्वर जाधव बार्शी विधानसभा सदस्य सतीश डोळसे धामणगाव सेक्टर अध्यक्ष मनोज कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments