बार्शी! माहेरून पैसे ना आणल्यामुळे सासरच्या लोकांनी विवाहितेला घराबाहेर काढले; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

फिर्यादी शाहिस्ता मोहसीन बागवान हिचा विवाह दि. १४ जून २०२० रोजी अहमदनगर येथील मोहसीन मंजूर बागवान याचे सोबत झाला होता. त्यावेळी साडेपाच तोळे सोने व संसारोपयोगी साहित्यासह तिच्या आई व आजोबांनी तिचे लग्न करुन दिले होते. सासरच्या मंडळींनी लग्नानंतर सहा महिने मला व्यवस्थित नांदविले त्यानंतर डिसेंबर २०२० ते दि. ४ मे २०२२ च्या दरम्यान, किरकोळ कौटुंबिक कारणावरुन सासू अफसाना मंजूर बागवान, पती मोहसीन मंजूर बागवान, दीर इसाक मंजूर बागवान, नणंद आशिया मंजूर बागवान, सासूची आई सुलताना नवाब बागवान, सासूचा भाऊ आसिफ नवाब बागवान (सर्व रा. धरती चौक, सतरंजी मस्जिद समोर, अहमदनगर) यांनी वेळोवेळी शिवीगाळी करुन मारहाण करुन, विहीरीच्या कामासाठी दोन लाख रुपये पाहिजे अशी पैशाची मागणी करुन शारिरीक व मानसिक त्रास दिला, तसेच पतीची मावशी आफरिन रियाज बागवान, रा. वडगांव, ता. बारामती ही नेहमी आमचे घरी येऊन घरातील सासरच्या मंडळींना माझ्याबद्दल काल्पनिक गोष्टी सांगून गैरसमज करुन देत असल्यामुळे सासरचे लोकांनी मला मारहाण करुन,
तू या घरात रहायचे नाही असे म्हणून त्या लोकांनी मला
घराबाहेर काढले. अशी फिर्याद शाहिस्ता मोहसीन बागवान (वय २०) (सध्यारा. सोमवार पेठ, पांडे चौक, बार्शी) हिने दिल्यावरुन, बार्शी शहर पोलिस ठाण्यात वरील सात जणांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३२३, ३४, ४९८-अ, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments