बार्शी! पानगावमध्ये २० वर्षीय युवकाला घरगुती वादातून काठीने मारहाण



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील पानगाव येथे वीस वर्षीय युवकाला घरगुती कारणावरून झालेल्या वादातून काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. लहू सुरेश पवार (वय २०)असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. 

घरगुती कारणावरून झालेल्या वादातून गणेश नाना पवार व इतर चार जणांनी मिळून लाकडी काठीने मारहाण केली होती,त्या मारहाणीमध्ये लहू हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथे हलवण्यात आले व त्यातून १६ मे रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे वडील सुरेश पवार यांनी दाखल केले आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे, या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिस चौकी येथे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments