वैराग नगरपंचायतमध्ये अधिकारीच राहतात गैरहजर सामाजिक कार्यकर्ते अमर राजे निंबाळकर यांची तक्रार



वैराग येथील नगरपंचायत मध्ये कार्यरत असणारा आधीकारी वर्ग हा नियमित हजर राहत नसल्या कारणाने वैराग मधील नागरिकांची कामे खोळंबत असल्याने हे कर्मचारी नियमित हजर राहण्यासाठी वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी नगरविकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय,सोलापूरचे सह आयुक्तांना लेखी तक्रारी अर्ज केला आहे.
 वैराग येथील नगरपंचायत मध्ये गेल्या वर्षभरात चार मुख्याधिकारी बदलले तर,काम करणारे आधीकरी वर्ग देखील सतत बदलले गेले आहेत.


नगरपंचायत स्थापनेस वर्षपूर्ती होत असताना कर्मचारी वर्ग मात्र अजूनही कायमस्वरूपी नसल्याने वैराग मधील नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांच्या लक्षात आले नागरिकांच्या त्रासाला पाहून या सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी अर्ज पाठविण्याचा निर्णय घेतला.

सध्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी सुवर्णा हाके, स्थापत्य अभियंता दिलीप खोडके, लेखपाल सागर जगताप,संगणक अभियंता महेश माने या चार आधिकऱ्याना वैराग नगरपंचायत मध्ये आठवड्यातून नेमून दिलेले वार देखील असताना त्या दिवशी हे आधिकारी वर्ग हजर राहत नाहीत, त्यांना फोन करून चौकशी केली तरी ते फोन द्वारे उडवाउडवची उत्तरे देतात. असेच जर होत राहिले तर एवढी मोठी नगरपंचायत असलेल्या जास्त लोखसंख्या असलेल्या वैराग मधील नागरिकांची कामे तरी होणार कशी तरी हे आधीकारी आठवड्यातून किमान दोन दिवस तरी वैराग नगरपंचायत मध्ये हजर राहावे असा तक्रारी अर्ज सामाजिक कार्यकर्ते अमरराजे मुकुंदराव निंबाळकर यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments