बार्शी! धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार



तुझे व मित्राचे प्रेमसंबंध असल्याचे तुझे घरी सांगेन, अशी धमकी देवून अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना दि. २८ मे रोजी दुपारी १. १० वाजता घडली. एकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

येथील जामगाव रोडवर आडोशाला बोलत बसलेल्या मित्र-मैत्रणी जवळ येवून आरोपी संदीप याने प्रथम पिडितेच्या मित्रास ढकलून देत पिडीतेला तुझे व मित्राचे प्रेमसंबंध असल्याचे तुझ्या घरी सांगेन, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी पिडीतेने मला व मित्रास सोड घरी जावु दे, अशी विनवणी करत असताना आरोपीने चिडून जावून पिडीतेच्या गालात जोरात चापट मारली याबाबत स्वतः अल्पवयीन पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीवर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments