सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रथमेश पवार हे तीन महिन्यांपूर्वीच भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. आपण सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळवायची आणि देशसेवा करायची असं स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच बघितलं होतं. वयाच्या २२ व्या वर्षी प्रथमेश यांनी जीवाची पराकाष्टा करत ते पूर्णही केलं. अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले.
0 Comments