प्रेयसीचे शौक पुरविण्यासाठी तरुणाने रचले अपहरणनाट्य, प्रेमी जोडप्याला अटक


 
प्रेम हे आंधळं असतं याचे ताजे उदाहरण लखनऊमध्ये पाहायला मिळाले आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचे शौक पुरविण्यासाठी अपहरणनाट्य रचले. अखेर पोलिसांनी अपहरणाचा छडा लावत प्रेमी जोडप्याला अटक केले आहे.


 लखनऊ येथील राणी पारा गावातील ही घटना आहे. भैयालाल यांचा मुलगा आशिष रावत संध्याकाळी गावातील एका कार्यक्रमात गेला होता. मात्र कार्यक्रमानंतर तो घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडीओ आला. त्या व्हिडीओत आशिष रश्शी बांधलेल्या अवस्थेत दिसत होता आणि व्हिडीओत माझे अपहरण करण्यात आले असून 1 लाख रुपयांची मागणी केली असल्याचे तो त्या व्हिडीओत सांगत होता.

व्हिडीओत त्याने बहिणीला सांगितले की, याबाबत पोलिसांना काही कळवलं तर ते माझा जीव घेतील अशी बतावणी केली. घरचे प्रचंड घाबरले होते. मात्र घरच्यांनी धाडस करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्परतेने दखल घेत त्या फोनचे लोकेशन ट्रेस केले. पोलिसांना रामपुरच्या मजरा गावात त्याचे लकेशन सापडले. लोकेशनला पोलीस पोहोचल्यानंतर तिथे आशिषसोबत त्याची प्रेयसीही होती. दोघांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता आशीषने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले प्रेयसीला शॉपिंग करण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी त्याने हे अपहरणाचे नाटक रचले. या प्रकरणी या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

Post a Comment

0 Comments