सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन तारखेची रमजान ईद नंतर 4 तारखेपासून महाराष्ट्रातील कोणत्याही मशिदीवर भोंगे वाजू देणार नाही असा इशारा दिला होता जर भोंगे वाजले तर त्या समोर त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवू असे त्यांनी सांगितले होते.
त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांनी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्यालय आणि घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी सोन्या मारुती व गणपती समोर महाआरती करण्याचा निश्चय केला होता त्या पद्धतीने भोंगे ऍम्प्लिफायर लावण्यात आले होते मात्र पोलिसांनी भोंगे वाजल्यापासून त्यांना रोखले आणि सर्व साहित्य जप्त केलं.
शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालीसा म्हणून राज ठाकरे यांच्या हाकेला साथ दिली. दरम्यान जिल्हाध्यक्ष महिंद्रकर आणि लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शीरसंवाद असतो ते सांगेल ते धोरण ते बांधतील ते तोरण त्यामुळे आम्ही ही हनुमान चालीसा म्हटली आहे परंतु पोलिसांनी सुड भावनेने आमचे भोंगे आणि अंपलिफायर जप्त केले आहेत. आमच्याकडे काय शस्त्रे आणि हत्यारे होती का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
0 Comments