करमाळा! उजनी धरणाच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा बळी



करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथील स्मशानभूमीजवळ उजनीच्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुमित दत्ता ढावरे (वय १८ ) व रोहित दत्तू ढावरे (वय १६ ) अशी त्यांची नावे आहेत. 

वांगी नंबर १ येथील दत्तू गुलाब ढावरे हे उदरनिर्वाहासाठी पुण्यात राहतात. एक महिन्या पूर्वी त्यांनी गावाकडे येऊन राहायचे म्हणून वांगी येथे शेड बांधले होते. त्यानंतर ते पुन्हा पुणे येथे मजुरीसाठी गेले होते. वांगी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी ते आले होते. दरम्यान सुमित व रोहित आंघोळीसाठी म्हणून स्मशानभूमीच्या बाजूने उजनीच्या पात्रात सकाळी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला. वांगी नंबर १ या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करमाळा पोलिसात याची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments