माढा/प्रतिनिधी:
माढा तालुक्यातील उपळवटे येथे किरकोळ कारणावरून सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. माहेरच्या लोकांना का बोलावली या कारणावरून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत विवाहिता जखमी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ज्ञानेश्वर घोरपडे (वय २३ रा.उपळवाटे) हिने टेम्भूर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी स्वातीच्या पती ज्ञानेश्वर घोरपडे आणि सासू संगीता घोरपडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्वाती घोरपडे हिची आई, वडील आणि भाऊ असे घरी आले होते. रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून पहाटेच्या सुमारास पतीने काठीने तर सासुने तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.पतीने तिच्या मुलाचा हिसकावून घेऊन त्याला ठार मारण्याची धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली हवालदार बारकीले पुढील तपास करीत आहेत
0 Comments