IPL 2022 : 15 बॉलमध्ये 56 रन कसे काढले?


कोलकाता नाईट रायडर्सच्या  पॅट कमिन्सनं  15 बॉलमध्ये नाबाद 56 रनची वादळी खेळी केली. कमिन्सच्या वादळामुळे मुंबई इंडियन्सचा  बुधवारी झालेल्या मॅचमध्ये 5 विकेट्सनं पराभव झाला आहे. केकआरचा या स्पर्धेतील तिसरा विजय असून मुंबईचा सलग तिसरा पराभव आहे. कमिन्सनं या खेळीत 4 फोर आणि 6 सिक्स लगावले. त्याने फक्त 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करत आयपीएल रेकॉर्ड देखील केला आहे. मुंबई इंडियन्सचा फस्ट बॉलर डॅनियल सॅम्सच्या  एकाच ओव्हरमध्ये कमिन्सनं 35 रन काढले.

‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवड झाल्यानंतर कमिन्सनं या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. कमिन्स यावेळी म्हणाला की, ‘मला स्वत:लाही धक्का बसला आहे. मी फार विचार करत नव्हतो. ही खरंच समाधानकाक बाब होती. बॉल हवेत तरंगतो. असंच वाटत होतं. मी लहान बाऊंड्रीच्या दिशेनं शॉट लगावण्याचा प्रयत्न करत होता. टीमनं मला कायम ठेवलं हे माझं भाग्य आहे,’ अशी प्रतिक्रिया कमिन्सनं दिली आहे.

केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं  आमची टीम एका रणनीतीवर काम करत होती. आम्ही त्यानुसार पुढे जाण्यापूर्वीच कमिन्सनं मॅच जिंकून दिल्याचं सांगितलं. मुंबईनं दिलेलं 162 रनचं लक्ष्य कमिन्सनं फक्त 16 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं.

अय्यर यावेळी म्हणाला की, ‘मी फक्त बॉल हवेतून जात असल्याचं पाहिलं. माझा विश्वास बसत नव्हता. ही त्याची सर्वश्रेष्ठ खेळी होती. आम्ही रणनीतीची अंमलबजावणी करण्यापूर्वीच पॅटनं मॅच संपवली.’ मुंबई इंडियन्सचा  कॅप्टन रोहित शर्मानं या प्रकारच्या इनिंगची अजिबात अपेक्षा नसल्याचं मान्य केलं. ‘मला या प्रकारच्या इनिंगची अजिबात अपेक्षा नव्हती. तो ज्या पद्धतीनं खेळला हे सर्व त्याचं श्रेय आहे. आम्ही बॅटींगमध्ये चांगली सुरूवात केली नाही. आम्ही 15 व्या ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होतो, त्यानंतर कमिन्सनं सर्व समीकरण बिघडून टाकलं.’ असं रोहित यावेळी म्हणाला.

Post a Comment

0 Comments