शरद पवार यांच्या मुंबई येथील घरासमोर एसटी कामगारांना घेऊन गोंधळ घातल्याबद्दल सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सोबतच आता पुणे , कोल्हापूर आणि बीड या ठिकाणी विविध कारणांवरून सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पण त्यांच्याशी निगडित आता अजून एक नवीन प्रकरण समोर आलेले आहे. त्यांनी भर हायवेवर आपल्या 12 वर्षे वयाच्या मुलीला कार चालवण्यास दिल्याचे उघडकीस आलेले आहे. यादव नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर टाकलेला आहे. आणि कारवाईची मागणी केलेली आहे. या व्हिडिओमध्ये सदावर्ते स्वतः आपल्या मुलीला प्रोत्साहन देत असताना दिसत आहेत.
0 Comments