मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात चौफेर टीका केली.या टिकेवरून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.आज ठाकरेंच्या टिकेवर शरद पवारांनी आज सकाळी मिश्किल टीका केली.यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की,भाजपचा लाऊड स्पीकर काल शिवतीर्थावर वाजत होता.
काल राज ठाकरेंची नाही, भाजपची सभा झाली. राज ठाकरेंना कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती आणि सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढंच नाही त्यांना मिळणाऱ्या टाळ्या देखील स्पॉन्सर होत्या. अक्कलदाढ एवढी उशीरा कशी काय येते?" अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
0 Comments