सांगोला! 'तू आमच्या घरी का आला' म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला


सांगोला/प्रतिनिधी:

तू आमचे घरी का आला असे म्हणून तरुणास तलवार, काठ्यान, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पाच तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट व गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन तोडून घेऊन गेले. अक्षय अमर पवार असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सांगोल्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत. याबाबत अक्षय अमर पवार रा. मेडशिंगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल वसेकर निलकंठ वसेकर, नवनाथ वसेकर, नागेश वसेकर, भारत वसेकर, नितीन वसेकर, अमोल वसेकर सर्व राहणार मेडशिंगी ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मेडशिंगी ता. सांगोला येथील अक्षय अमर पवार हा गावातील मित्र दिपक कांबळे यांचे पिकअप घेऊन चौकट आणण्यासाठी गेला होता. चौकट घरी ठेवून पिकअप मनोज वसेकर यांच्या घराजवळ लावण्यासाठी गेला होता. त्यावेळी विठ्ठल वसेकर याने अक्षय पवार यास तू आमच्या वस्तीवर का आलास असे म्हणून शिवीगाळी करीत तुला आत्ता सोडत नाही असे म्हणुन घरात जावून तलवार घेवून आला. विठ्ठल वसेकर याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न करीत असताना वार चुकवुन बाजूला पळत असताना तलवारीचे पुढचे टोक अक्षय पवार पाठीवर चार-पाच वेळा खरचटले. त्याचवेळी निलकंठ वसेकर हा घरातून कोयता घेवून आला आणि याला जिवंत सोडू नका असे म्हणुन शिवीगाळी करु लागला. त्यावेळी त्या ठिकाणी नवनाथ वसेकर, नागेश वसेकर हे हातात काठी घेवुन आले. नवनाथ वसेकर व नागेश वसेकर यांनी काठीने हाताच्या मनगटावर पाठीवर मारहाण केली. तसेच भारत वसेकर, नितीन वसेकर व अमोल वसेकर यांनी याला आता सोडायचे नाही असे म्हणून अक्षय पवार यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल वसेकर याने अक्षयच्या हातातील पाच तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट व गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन तोडून घेऊन गेला.

 त्यानंतर अक्षय पवार हा जखमी अवस्थेत चालत मेडशिंगी गावातील एसटी स्टँडसमोर आला असता वरील सर्व लोक हातात काठ्या घेऊन त्या ठिकाणी आले. याला आज सोडायचे नाही असे म्हणून नवनाथ वसेकर, नागेश वसेकर व निळकंठ वसेकर यांनी हातातील काठ्याने दोन्ही पायाच्या मांडीवर व पाठीवर मारहाण केली. तसेच विठ्ठल वसेकर, अमोल वसेकर, भारत वसेकर व नितीन वसेकर यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अक्षय पवार यांच्यावर सांगोला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अक्षय अमर पवार यांनी वरील सात जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments