माढा! चेअरमन चेअरमन शिंदे चेअरमन शिंदे यांच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना पत्र वाटप



मौजे- टेंभुर्णी, ता- माढा येथे आज बुधवार दिनांक १३/०४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता संजय गांधी योजनेमधील श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ,विधवा , अपंग योजना,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इ.वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना पत्र वाटपाचा कार्यक्रम सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा.श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते रोटरी हॉलमध्ये करण्यात आला.
                
याप्रसऺगी बोलताना रणजित (भैय्या) शिंदे म्हणाले की, यशराज बहुउद्देशीय संस्था व सरपंच प्रमोद कुटे व बापू कुटे यांचे सर्व सहकारी यांनी बरेच प्रयत्न केल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची १०० प्रकरणे मंजूर झालेली आहेत. त्याचबरोबर मागील तीन वर्षापासून कुटुंबातील प्रमुख स्त्री किंवा पुरुषाचे निधन झाले असेल  व त्यांचे उत्पन्न वीस हजाराच्या आतमध्ये किंवा ते दारिद्रय रेषेखाली असल्यास त्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून वीस हजार रू. आर्थिक अनुदान मिळते. आपल्या टेंभुर्णी गावातील एकही पात्र लाभार्थी राहू नये याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण केलेल्या कामाचे सोशल मीडिया वरती प्रसिध्दी केली पाहिजे नाहीतर न केलेल्या कामाऺचे श्रेय घेण्यास लोक तयार असतातच.
         
ते पुढे बोलताना म्हणाले की, टेंभुर्णी दुध संघासमोर जवळपास ३० गाळे काढणार आहोत.ज्या कोणास पाहिजे असतील त्यांनी तेथे अर्ज द्यावेत. गाळे मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे परंतु गरजू व्यावसायिकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे.त्याचबरोबर महिला बचत गटास दुध संघाचे दुध डेअरी किंवा दुध,आईस्क्रीम, सुगंधी दुध,लस्सी,पेढा व इतर सर्व प्रकारच्या उत्पादनांची विक्री केंद्र चालवण्यासाठी देणार आहोत. पण त्या स्वतः महिलांनी चालवल्या पाहिजेत ही महत्त्वाची अट असणार आहे.त्यादॄष्टीने योजना तयार करत आहोत.
       
  यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे, रमेशनाना येवले पाटील,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे, सरपंच प्रमोद कुटे, परमेश्वरमामा देशमुख,रामभाऊ शिंदे, रावसाहेब (नाना) देशमुख, अशोक मिस्कीन, अमोल डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ, सोमनाथ साळुंखे, माजी सरपंच अनिल जगताप, सुरेश कुटे, विठ्ठल कोळपे, रोहित आरडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुटे,माढा तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे उपाध्यक्ष संजय मिस्कीन, महेंद्र वाकसे तसेच टेंभुर्णी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व योजनेचे पुरुष व महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments