देशभरातील कुस्तीप्रेमी साठी कोल्हापूरची कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाते, गेली दोन दशकात कोल्हापूरकराने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली नव्हती. सातारा येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत तोमान घेऊन कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. 2001 साली विनोद चौगुले यांनी मिळवली होती मानाची गदा.
महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात सामना झाला. पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केला. पृथ्वीराजने वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत.
'महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अंतिम लढत झाली ज्यामध्ये पृथ्वीराजने विजयाची नोंद केली आहे. कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापुरातील मल्ल पृथ्वीराज पाटील यांनी यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पृथ्वीराजच्या या यशाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.' अशा शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
0 Comments