युवाहृदयसम्राट युवा सेना प्रमुख नामदार अदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व युवा सेना सचिव वरून सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर, रुपेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश (दादा) वानकर, युवासेना सहसचिव विपुलजी पिंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बार्शी शहर प्रमुख विजय माने यांच्या मार्गदर्शना खाली पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल,डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत.
सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. म्हणून वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी थाळी,ताली बजाव वाजवुन आंदोलन तहसील च्या आवारात आयोजीत केले होते.
यावेळी उपस्थित युवासेना बार्शी शहर प्रमुख हेमंत रामगुडे, विद्यार्थी सेना बार्शी तालुका प्रमुख पांडुरंग घोलप, ज्येष्ठ शिवसैनिक चोबे काका,अजय बनसोडे,सागर धालगडे, विक्रम क्षीरसागर, प्रदिप घोडके, दर्शन देशमुख अहमद शेख,निहाल बागवान,योगेश जाधव , सचिन बनसोडे आदि युवा सैनिक उपस्थित होते.
0 Comments