बार्शी तालुक्यातील नागझरी नदीवर सासुरे-कौठाळी या रोडवरील नदीपात्रात, २ कोटी ८९ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या बंधा-याच्या कामाच्या प्रगतीची प्रत्यक्ष पाहणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
त्याचबरोबर नागझरी नदीपात्रात १ कोटी २० लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या आणखी एका कोल्हापूर पध्दतीने बांधण्यात येणाऱ्या बंधा-याच्या कामावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. कोल्हापूर पध्दतीने बांधण्यात येत असलेल्या या बंधा-याच्याबाबत सासुरे व दहिटणे या गावातील शेतकऱ्यांचा मनामध्ये काही शंका उपस्थित होवून गैरसमज निर्माण झाले होते. मी स्वतः प्रत्यक्ष सासुरे व दहिटणे या गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या शंका व गैरसमज दूर केले.
नागझरी नदीपात्रावर बांधण्यात येत असलेल्या या दोन बंधा-यामुळे नदीपात्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राळेरास पासून ते सासुरे, दहिटणेच्या शेतकरी बांधवांच्या जीवनात हरीत क्रांती होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
यावेळी माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर, माजी नगरसेवक विलास आप्पा रेनके, जलसंधारण विभाग सोलापूरचे मुख्य कार्यकारी अभियंता आण्णासाहेब कदम, अभियंता सचिन किरणाळे, नाना धायगुडे व सासुरे-दहिटणे गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments