बार्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात सुरु होती. आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राजपत्रात याविषयीची अधिसूचना प्रसिध्द केल्याने, आता ही उत्सुकता संपुष्टात आली आहे. बार्शी तालुक्यातील एकूण १८ गावांचा या मार्गासाठी समावेश करण्यात आला आहे.
राजपत्रातील अधिसूचनेत प्रसिध्द केल्यानुसार हा ग्रीन फिल्ड
एक्सप्रेस वे बार्शी तालुक्यातील, नागोबाची वाडी, लक्षाची वाडी, उपळाई, अलीपूर, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, दडशिंगे, पानगांव, उंडेगाव, काळेगांव, मानेगांव, वैराग, सासुरे, सर्जापूर, हिंगणी (आर), चींचखोपण, रातंजन मार्गे पुढे तुळजापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे.
या मार्गाचा नकाशा आणि गट क्रमांक याबाबत मात्र उत्सुकता कायमच आहे. डीपीआर तयार होताच त्यांचेही प्रसिध्दीकरण होऊन येत्या काही दिवसात भूसंपादनाच्या कामाला लवकरच गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments