भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय महान कायदेपंडित थोर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती प्रहार जनशक्ती पक्षाकडून पक्षाच्या कार्यालय मध्ये साजरी करण्यात आली. यानिमित्ताने परंडा तालुक्यातील अनाथ व अपंग बांधवांना अन्नधान्याचे किट वाटप महात्मा फुले चौक येथे करण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील, उपाध्यक्ष बालाजी पारेकर, गोकुळ गवारे, परंडा भूम वाशी प्रहार शेतकरी संघटना संपर्कप्रमुख वर्षद शिंदे, तालुका संपर्क प्रमुख भैरवनाथ गोडगे, लोणी सर्कल प्रमुख अंकित पाटील परंडा शहर प्रमुख भरत नन्नवरे, अप्पासाहेब तरटे, मनोज पाडुळे,राजू बंडगर,वंचित बहुजन आघाडी नेते गोवर्धन शिंदे,तानाजी बनसोडे आदिमोठ्या प्रमाणात प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments