सोलापूर! जुगार अड्डावर विशेष छापा, ३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल


सोलापूर/ प्रतिनिधी:

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशान्वये विशेष पथकाने जवाहर नगर जुना विडी घरकुल सोलापूर येथे एका घरामध्ये पैशांवर पैज लावुन जुगार खेळत असताना छापा टाकुन एकुण १४ इसम व जुगार साहीत्य, रोख रक्कम जुगारासाठी वापरण्यात आलेले मोटार सायकल, मोबाईल हँडसेट असे एकूण ३ लाख ६१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

जवाहर नगर जुना विडी घरकुल सोलापूर येथे एका घरामध्ये काही इसम पैशांवर पैज लावुन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकास मिळाली त्या अनुषंगाने विशेष पथकांनी जवाहर नगर जुना विडी घरकुल सोलापूर येथे पंप्पु यादवांच्या  याचे घरामध्ये छापा टाकला . असता सदर ठिकाणी यातील इसम नामे (१) संजय चिदानंद हुंडेकरी, (२) अमीर बुऱ्हान शेख (३) सोमनाथ गंगाधर मोरे (४) शाबीर रफिक शेख (५) दिलीप हणुमंतू रोडगे, (६) लखन अनिल तळभंडारे, (७) शाहीद सादिक बागवान, (८) अमीर मुसा शेख (९) अमीन अब्दुल मुकाशी, १०) सुग्रीव भालचंद्र भवाळ, ११) विकी किसन गायकवाड, १२) कोंडीबा बालाजी कंसाळे, १३) दिपक नागनाथ साळुंके, १४) सागर राम घोडके असे सर्वजण गोलाकार बसून ५२ पत्याच्या पानावर पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना मिळुन आले तसेच नमुद इसमांना जागा उपलब्ध करून देणारा पंप्पु यादव व जुगाराचा आड्डा चालविणारा आकाश तळभंडारे राहणार धाकटा राजवाडा कौतम चौक सोलापूर हे असल्याने ताब्यात घेतलेल्या इसमांनी सांगितलेले आहे. सदर ठिकाणी मिळुन आलेले जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, मोटार सायकल, मोटार स्कूटर,५२ पत्त्यांचा डाव साहित्य असे एकूण ३ लाख ६१ हजार २४० रुपयांचा  मुद्देमालासह १४ इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर बाबत एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. तसेच पाहीजे आरोपी नामे पंप्पु यादव आकाश तळभंडारे राहणार धाकटा राजवाडा कौतम चौक सोलापूर पुर्ण नाव व पत्ता माहित नाही यांचा शोध सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे,पोलीस हवालदार दिलीप भालशंकर, पोलीस नाईक योगेश बर्डे, पोलीस नाईक वाजीद पटेल, पोलीस कॉन्स्टेबल  संजय साळुंखे, पोलीस नाईक वाकडे यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments