सोलापूर! स्मार्टसिटीचे सीईओसह ९ जणांवर गुन्हा दाखल



सोलापूर/ प्रतिनिधी:

शॉक लागून पाच वर्षाच्या बालिकेच्या मृत्युप्रकरणी स्मार्टसिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटलांसह नऊ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २९ जुलै २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच सोलापूर येथे घडली. याप्रकरणी म.पो.स.ई अश्विनी कोंडीराम काळे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्रिंबक ढेंगळे पाटील, सनर्वमल खटुवाला, प्रोजेक्ट मॅनेजर मिलिंद पेठे, इलेक्ट्रिक इंजिनिअर नरेश शर्मा, रोहित रसेराव, चंद्रकांत दिघे, गणपत कांबळे, राजू बागडे आणि तत्कालीन मुख्य तांत्रिक अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांनी विजय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीस राज्याचे विद्युत ठेकेदार अनुज्ञाप्ती नसताना त्यांना विद्युत कामाचा बेकायदेशीररीत्या तात्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी ठेका दिलेला आहे. मात्र विजय इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर खटुवाला, पेठे, शर्मा, रसेराव यांच्याकडे राज्याची विद्युत ठेकेदाराची अनुज्ञाप्ती नसताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस या मार्गावर विद्युत एल.टी फिडर पिलस बसवली. 

त्यावेळी महावितरण कार्यालयाकडे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे व बाळीवेस विभागाचे शाखाधिकारी गणपत कांबळे वायरमन, राजू बागडे यांनी वेळोवेळी त्या भागात पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी असताना त्यांनी निष्काळजीपणा व हायगय केली. त्या फिडर पिलर ला सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न केल्याने बालिका पूर्वा अलकुंटे हिचा शॉक लागून मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

0 Comments