वैराग पोलिसांचा हात भट्टी अड्ड्यावर छापा; ४ जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी तालुक्यातील येमाई तांडा, तांबेवाडी येथे अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती होत असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली. त्यानुसार वैराग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता मानवी आरोग्यासाठी अपायकारक असणारे दारू तयार करत असल्याचे दिसून आले, पोलिसांची चाहूल लागताच दारू तयार करणाऱ्या चौघांनी धूम ठोकली पोलिसांनी चोघा जणांविरुद्ध दारूबंदी अधिनियम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल केलं करण्यात आले आहेत.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, 15/04/2022 रोजी 13.00 वाजता वरील आरोपी नामे 1) पपेश शोभा राटोड  2) सुनिल बाबुराव राठोड 3) प्रविण सुरेश राठोड 4) रमेश बाळु राठोड  सर्व रा.यमाईतांडा तांबेवाडी ता.बार्शी जि.सोलापुर हे विनायक रतन राठोड यांचे शेतात  गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रीत कच्च्या रसायन मध्ये युरिया, कुजविलेले गुळमिश्रीत रसायन, झाडाच्या साली असे वस्तु मानवी आरोग्यास हानीकारक होईल तसेच ज्यामुळे मानवी आरोग्याचे दु:खापतीस व मृत्युस कारणीभुत होतील अशा वरील मुच्र्छाकारक, नशाकारक, अपायकारक, तयार होणारी दारू सेवन केल्यामुळे मानवी आरोग्यास हानी पोहचेल अशा वस्तु वापरून त्यापासुन होणारे कच्चा रसायनापासुन गावठी दारू तयार करण्याचे उद्देशाने सदर ठिकाणी वरील वर्णानाचे व किंमतीचे गूळमिश्रीत रसायन व ह.भ दारू एकुण किंमत 15450/- रू. चा माल जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळुन आला व आम्हास पाहताच तो पळुन गेला म्हणुन माझी त्याचे विरूध्द सरकारतर्फे भादवि संहिता कलम 328 व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम65(ई) व (फ) वैराग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Post a Comment

0 Comments