दि. २४ एप्रिल रोजी रात्री दहाचे सुमारास खानापूर रोड, सोमवार पेठ , बार्शी येथील आमच्या रहात्या बिल्डिंग समोरील रस्त्यावर, सुशांत पाटील ,दिनेश देसाई, पवन इटकर, कालीचरण वस्ताद व इतर अन्य २० ते २५ लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून, त्यांचेकडील गाड्यांची मोठमोठ्याने रेस करुन, माझे चुलत भाऊ सोनू नायकोजी व आकाश नायकोजी व आम्हांस मोठमोठ्याने शिवीगाळी केली . तसेच त्यांचे हातातील कोयते, लोखंडी रॉड व लाकडी दांडके दाखवून, आम्हास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व आमच्या घरावर दगडफेक करुन, आमच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच आमच्या कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद, सागर भास्कर नायकोजी ( वय ३३ ) रा . खानापूर रोड, सोमवार पेठ , बार्शी यांनी सुशांत पाटील, दिनेश देसाई ,पवन इटकर,कालीचरण वस्ताद व इतर अन्य २० ते २५ जणांविरुध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार भा.दं.सं. १८६० कलम १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ४२७,५०४ , ५०६ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम , १ ९ ५१ कलम १३५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments