मोहोळ! 'या' ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश



बनावट जातीचा दाखल जोडून निवडणूक लढवल्याप्रकरणी मिरी (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य बाबू गुरप्पा बाबू गुरप्पा कोळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश पुण्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. बाबू कोळी यांनी ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी बोगस दाखला तयार केला. तो सादर करून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले संजय भोसले यांनी कोळी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली. 

समितीने कोळी यांना बाजू मांडण्यासाठी वकिलासह हजर राहण्याचा आदेश दिला. तसेच चौकशी समितीने त्यांना अनेकदा वेळ दिली. तरीही ते हजर राहिले नाहीत. त्यांचा दाखला तपासणी समितीला दप्तरात कोठेही आढळला नाही. त्यांनी जातीच्या दाखल्यावर तहसीलदार यांची स्वाक्षरी व शिक्का वापरल्याची बाब अॅड. पोपट कुंभार यांनी समितीच्या निदर्शनास आणली. त्यामुळे समितीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

Post a Comment

0 Comments